| If you cannot view this document in Marathi, click here to view PDF. |
www.mySSC.in विषयी काय सांगता येईल? |
महाराष्ट्र बोर्डाच्या इंग्लीश - सेमी इंग्लीश माध्यमाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी ही वेबसाइट असून अशा प्रकारची पहिलीच वेबसाइट आहे.
तज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने आणि दहावीचा नवीन अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकांचे स्वरूप लक्षात घेऊन ही वेबसाइट केलेली आहे. Science I, Science II, Algebra, Geometry, History-Civics, Geography-Economics, English, Marathi इत्यादी महत्वाच्या विषयांसाठी हा वाटाड्या तुम्हाला मदत करेल.
|
|
अभ्यासासाठी इंटरनेट वापरण्याचे फायदे काय?
|
| इंटरनेटच्या माहितीजालाकडे पाहिलेत तर तुम्हाला असे दिसेल की जगातील सर्व विषयांचे ज्ञान आता
इंटरनेटवर उपलब्ध आहे. शैक्षणिक साधनांची व शिक्षकांच्या सहाय्यकांची कमतरता यावर स्थळ काळापलीकडे जाऊन मात करू शकणारे आधुनिक युगाचे माध्यम म्हणजे इंटरनेट.
या नव्या माध्यमाची मदत घेऊन शैक्षणिक साहित्य निर्माण केले गेले तर खर्च, कालबाह्यता आणि दर्जाची घसरण या सर्वांवर मात करता येऊ शकेल असे वाटल्याने तसेच उत्तम दर्जाचे शैक्षणिक साहित्य शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सारख्याच सहजतेने उपलब्ध होईल या विश्वासाने आम्ही ही वेबसाइट विद्यार्थ्यांना उपलब्ध केली आहे.
संगणकाच्या माध्यमात माहिती उपलब्ध करताना रंगांचा मुक्त वापर करून विषय सादर करता येतो. पृष्ठसंख्येची मर्यादा येथे नसल्यामुळे विषयाचे स्पष्टीकरण
विस्ताराने शक्य होते.
ऍनिमेशन हे एक अत्यंत उपयुक्त तंत्र या माध्यमासाठी विकसित झाले आहे. अनेक मूलभूत कल्पना ऍनिमेशनच्या मदतीने तुमच्या समोर साकार करण्याचा प्रयत्न येथे केलेला दिसतो. त्यामुळे विषय समजणे व लक्षात ठेवणे सोपे जाते. इंटरनेट वर अभ्यास करताना तुम्हाला जागरुक आणि तत्पर राहावे लागते कारण यातील बहुतेक टप्प्यावर तुम्हाला काहीना काही उत्तर दिल्याशिवाय पुढे सरकता येत नाही.
इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्यास कोठेही ही माहिती उपलब्ध होऊ शकते. नागरिकांवर असलेला शहरी रहदारी किंवा प्रवासाचा ताण दूर करणारी अशी ही सुविधा आहे.
इंटरनेट ही अशी एक शाळा आहे जेथे तुम्ही हव्या त्या वेळी जाऊ शकता, पाहिजे त्या विषयाचा अभ्यास करू शकता.
येथील शिक्षक केवळ तुम्हालाच शिकविण्यासाठी हजर आहेत. त्यामुळे तुमच्या कलाने आणि गतीने तुम्हाला विषय समजावून घेता येतो. तोच तोच भाग
पुनः पुनः वाचला म्हणून तुम्हाला रागावणारे कोणी नाही किंवा एखाद्या संकल्पनेचे लवकर आकलन झाले तर पुढच्या भागाकडे जायला रोखणारेही
कोणी नाही.
एखादा भाग न कळल्यास तुम्ही प्रश्नही विचारू शकता, कितीही वेळा. तुम्हाला हसणारे इथे कोणी नाही.
|
|
अभ्यासासाठी इंटरनेट वापरण्याचे फायदे काय?
|
नुकत्याच एका सर्वेक्षणावर आधारित एक लेख वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. त्यानुसार पालकांना मुले
इंटरनेटवर काय पाहतील / वाचतील याची खात्री नसल्यामुळे ही सुविधा देताना भीती वाटते असे दिसते.
जरा शांतपणे विचार केला तर ही भीती अनाठायी आहे हे लक्षात येइल. कारण याच तर्काप्रमाणे मुलांना साक्षर करणेच घातक ठरेल. ज्ञान मिळविण्याची सगळीच साधने दुधारी आहेत.
ती घडवू शकतात तसेच बिघडवू शकतात. मुलांवर संस्कार करणे, काय चांगले काय वाईट याविषयी मोकळेपणाने बोलणे हाच त्यावरचा उपाय असू शकतो. बंदी घातली तर तीच गोष्ट मुलांना काय मोठ्यांनाही करावीशी वाटते. मात्र इंटरनेट उपलब्ध
करून न दिल्यामुळे मुले एका प्रभावी माध्यमाला मुकतात हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
|
|
myssc.in वर प्रवेश घेण्याचे फायदे काय?
|
या वेबसाइटवरील सर्व अभ्यास साहित्याची मांडणी खालील 5 प्रकारात करण्यात आली आहे.
- स्टडी मटेरियल - सोप्या शब्दातील स्पष्टीकरण व ऍनिमेशनसहित शॉर्ट नोट्स
- प्रश्न पेढी - बलून हेल्प, आकृत्या, फोटो यांसह तयार केलेली प्रत्येक पाठाची प्रश्नोत्तरे
- ऑन-लाइन टेस्ट - अनेक वेळा घेता येणारी 10 बहुपर्यायी प्रश्नांची चाचणी
- प्रश्न पत्रिका - बोर्डाने ठरविलेल्या पॅटर्नप्रमाणे प्रश्न पत्रिका व त्यांची उत्तरे
- जुने पेपर - बोर्डाचे जुने पेपर व त्यांची उत्तरे
- ब्लॉग - पाठ्यक्रमाचा आपल्या रोजच्या जीवनाशी असलेला संबंध ठळकपणे सांगणाऱ्या घटना
- तज्ञांना प्रश्न विचारा - तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा.
|
|
myssc.in च्या अभ्यास पद्धतीविषयी अधिक माहिती सांगू शकाल का?
|
स्टडी मटेरियल, प्रश्न पेढी, ऑन-लाइन टेस्ट, प्रश्न पत्रिका, जुने पेपर याविषयी अधिक माहिती पुढे दिली आहे. याची प्रत्यक्ष झलक तुम्ही Free Demo मधे पाहू शकता.
|
स्टडी मटेरियल |
पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धड्याचे स्पष्टीकरण सोप्या शब्दात दिले आहे. याशिवाय आकृत्या, ऍनिमेशन,
इंटरनेटवरील उपयुक्त वेबसाइटची लिंक अशा सुविधा दिल्या आहेत. |
प्रश्न पेढी |
प्रश्नांच्या मालिकेतून विषय आत्मसात करण्याचा हा मार्ग आहे. या पेढीमध्ये प्रत्येक पाठावर बोर्डाने निर्धारित केलेल्या प्रश्नप्रकारात प्रश्न मांडलेले आहेत. विद्यार्थी त्यांची उत्तरे मनाशी जुळवून दिलेल्या उत्तरांशी त्याची तुलना करू शकतात.
अनेक अनुभवी आणि नामवंत शिक्षकांचा सहभाग ही पेढी तयार करताना झालेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच उपयोग होईल.
उत्तरे सादर करीत असताना त्यातील कठीण संज्ञांचे स्पष्टीकरण बलूनच्या साह्याने पाहता येते. माउस कर्सर या संज्ञेवर येता क्षणी हे बलून दिसू लागते. आवश्यक तेथे स्पष्टीकरणासाठी चित्रांचा भरपूर वापर केलेला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया रंजक होईल असे वाटते.
|
ऑन-लाइन टेस्ट |
या सुविधेच्या मदतीने विद्यार्थी वेळोवेळी आपली तयारी कुठपर्यंत आली आहे याची चाचपणी करू शकतात. यात प्रत्येक वेळी निवडलेल्या पाठावर 10 बहुपर्यायी प्रश्न समोर येतात व विद्यार्थ्याने त्यांची उत्तरे लगेचच द्यावी ही अपेक्षा आहे.
10 ही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर सिस्टिम लगेचच या चाचणीचे गुण जाहीर करते. एवढेच नव्हे तर आपल्या उत्तरांचे विश्लेषण करून सांगितले जाते. |
प्रश्न पत्रिका |
संपूर्ण पाठ्यक्रमावर आधारलेल्या प्रश्न पत्रिका नोव्हेंबरपासून सरावासाठी दिल्या जातील. या प्रश्नांची उत्तरेही दिलेली असल्यामुळे पालकांना किंवा स्वतः विद्यार्थ्यांना आपली उत्तरपत्रिका तपासता येईल. या सर्व प्रश्नपत्रिका बोर्डाने ठरविलेल्या पॅटर्नप्रमाणे आहेत. फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त प्रश्न पत्रिका दिल्या जातील.
|
जुने पेपर |
या अभ्यासक्रमानुसार असलेले जुने पेपर व यांची उत्तरे या विभागात मिळतील. काय प्रकारे बोर्डाची परीक्षा घेतली जाते याची कल्पना यावरून येईल. |
ब्लॉग |
या सदरामध्ये पाठ्यक्रमाचा आपल्या रोजच्या जीवनाशी असलेला संबंध ठळकपणे सांगणाऱ्या घटना, बातम्या, लेख, दिनविशेष वगैरे आपल्याला पहायला मिळेल. हे सदर नियमित अपडेट होते. |
|
myssc.in ला प्रवेश कसा घ्यायचा?
|
प्रवेश घेणे अतिशय सोपे आहे.
- विनाशुल्क रजिस्ट्रेशन करा.
- प्रवेशमूल्य भरा.
- आपले अकाउंट सुरू होईल.
याविषयी अधिक माहितीसाठी admissionयेथे क्लिक् करा.
|
|
|
myssc.in ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. ही साइट आपणांस उपयोगी पडेल अशी आशा आहे. अधिक माहितीसाठी support@myssc.in ला इ-मेल करा. धन्यवाद!
|
|
|