गणिताचा पेपर लिहिताना . . . . . .

गणिताचा पेपर लिहिताना . . . . . .


श्री. दीनानाथ गोरे.

उदाहरण सोडवत असताना उदाहरण बरोबर उतरवून घेतले आहे का ते पहा. एक पायरी (स्टेप) केल्यावर लगेच तपासा. दुसरी पायरी केल्यावर लगेच तपासा. असे केल्यास पूर्ण उदाहरण बरोबर येऊन त्या प्रश्नाचे सर्व गुण मिळतील. (घरी किंवा शाळेत, प्रश्नपत्रिका किंवा सराव करत असताना उदाहरण बरोबर येण्यासाठी पण वरील गोष्ट कराच.)

बोर्डाच्या परीक्षेत काळी किंवा निळी शाई असलेला पेनच किंवा बॉलपेन वापरायला परवानगी आहे. म्हणून लिहिताना आतापासूनच काळी किंवा निळी शाईच वापरा.

प्रश्नपत्रिका सोडवत असतांना न येणारे उपप्रश्न सोडून देऊ नका. त्या उपप्रश्नासाठी जेवढ्या पायऱ्या येतील तेवढ्या लिहा. त्या बरोबर पायऱ्यांचे गुण मिळतील. काहीच लिहिले नाही तर गुण कसे मिळणार?

बीजगणिताची, पाठ्यपुस्तकातील सोडवलेली पाच उदाहरणे व भूमितीची सोडवलेली 5 उदाहरणे रोज अभ्यासा. बोर्डाच्या परीक्षेत, त्यापैकी काही प्रश्न विचारले जातील हे लक्षात घ्या.

रोज आवडत्या देवतेचे स्मरण करुन 5 मिनिटे ध्यानधारणा करा. एकाग्रता वाढेल.

लिखाणाचा स्पीड (वेग) वाढवा. कारण बोर्डाच्या परीक्षेत बीजगणित किंवा भूमितीच्या पेपर सोडवत असतांना, पहिले 28 गुणांचे 3 प्रश्न घड्याळी एक तासात पूर्ण व्हायला पाहिजेत. नंतरच्या 32 गुणांच्या चौथ्या व पाचव्या प्रश्नासाठी दीड तास वेळ राखून ठेवायला हवा. थोडक्यात, सोप्या / मध्यम प्रश्नांसाठी एका तासात 25 ते 30 गुणांचे प्रश्न शक्यतो सोडवून व्हावेत.

भूमितीची सूत्रे लिहून काढून नीट लक्षात ठेवा. आकृत्यांचा (प्रकरण 3) चांगला सराव करा. समजलेल्या धड्यांचा (प्रकरणांचा) म्हणजेच त्या प्रकरणांवरील प्रश्नांचा (सर्व प्रकारच्या) जास्त सराव करा. लिखाणाचा स्पीड वाढवा.

कुठल्याही परिस्थितीत घाबरु नका. ताण घेऊ नका. यश मिळणारच असा विश्वास ठेवा.

Best of luck !


Previous PostNext Post
 

Top